विना वाहक बस
तिकीट छपाईच्या ट्रायमॅक्स मशीनच्या नवीन छापील तिकीट प्रणालीमुळे आता तिकिटावर मार्गाचे नाव, दिनांक आणि वेळ पण दिसते तेंव्हा रेल्वे प्रमाणे प्रवासी एकच तिकीट काढून वेगवेगळ्या बसने टप्प्याचा प्रवास करू शकेल. उदा. प्रवासी पुणे-अमळनेर तिकीट काढील जे पुढील १६ तास वैध राहील आणि मग प्रवासी हव्या त्या बस ने प्रवास करील. जागो जागी तिकीट चेकर ठेवले तर अनेक बस विना वाहक चालतील.
लांब पल्याच्या बसेस बंद करा:
जर सुरुवातीचे स्थानक ते ५0 किलोमीटरच्या आतील थांब्यापासून शेवटच्या थांबयापर्यंत ५०% पेक्ष्या कमी प्रवासी असतील तर अशा लांब पल्याचे सगळे मार्ग ताबडतोब बंद करा कारण ह्या बसेस पुढे मोकळ्या जातात उदाहरण पुणे-सुरत (मार्गे नाशिक) बस ज्यात थेट पुणे ते सुरत एकही प्रवासी नसतो. जेणेकरून एसटीचे अनेक खर्च वाचतील. जसे दोन चालक. त्यामुळे गर्दीच्या छोट्या मार्गावर अनेक गाड्या चालवता येतील. त्या साठी वाहकाच्या तिकीट छपाईच्या ट्रायमॅक्स मशीनच्या डेटाचे संकलन आणि विश्लेषण करून कोणत्या लांब पल्याच्या कोणत्या बसेस बंद करता येतील हे पाहणे शक्य आहे.
